mahapariksha portel
mahapariksha portel 
महाराष्ट्र

बंद करा महापरीक्षा पोर्टल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सरकारी पदांच्या भरतीसाठी वापरण्यात येणाऱ्या महापरीक्षा पोर्टलमुळे राज्यात अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती आहे. या पोर्टलद्वारे केल्या जाणाऱ्या भरतीत गैरप्रकार होत आहेत. यामुळे हे पार्टल बंद करावे. सरकारी भरतीसाठी परीक्षा घेण्यास राज्य लोकसेवा आयोग असताना सरकार खासगी कंपन्यांकडून पोर्टल का चालवीत आहे, असे प्रश्‍न उपस्थित करून सर्व भरती परीक्षा या एमपीएससीद्वारे घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. 

सरकारी पदासाठी भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या समन्वय समितीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. महापरीक्षा पोर्टलमुळे गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना डावलले जाते. गैरप्रकार करून भरतीप्रक्रिया केली जाते, असा आरोप यात करण्यात आला आहे. 
देशातील निवडणुका या स्वायत्त असलेल्या निवडणूक आयोगाकडून म्हणजे सरकारी यंत्रणेकडून घेतली जाते. मग सरकारी पदांच्या भरतीसाठी खासगी कंपन्यांद्वारे प्रक्रिया का केली जाते. अधिकाऱ्यांची भरती एमपीएससीद्वारे केली जाते, त्याचपद्धतीने अन्य श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती या व्यवस्थेद्वारे का केली जात नाही. सरकार बदलले की भरती परीक्षा करणाऱ्या कंपन्या का बदलल्या जातात, असा सवाल समितीचे पद्माकर होळंबे उपस्थित केला आहे. 

...हे आहे आंदोलकांचे आक्षेप 
महापरीक्षेच्या वेळी सामूहिक कॉपीचे प्रकार होणे, अभ्यासक्रमानुसार परीक्षा न होणे, प्रश्‍नांची पुनरावृत्ती होणे, हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने न होणे, परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था चांगली नसणे, डमी उमेदवारांद्वारे परीक्षा देण्याचे प्रकार घडत असल्याचे समितीचे पद्माकर होळंबे यांचे म्हणणे आहे. 

निर्णय न झाल्यास राज्यभर आंदोलन 
भरतीमधील गैरप्रकार टाळण्यासाठी महापरीक्षा पोर्टल रद्द करून सर्व भरती एमपीएससीद्वारे करावी, अशी राज्यातील सर्वच तरुणांची मागणी आहे. त्यानुसार सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. महापरीक्षा पोर्टलवरून भरतीपरीक्षा घेताना अनेक ठिकाणी डमी उमेदवार आढळले आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही. या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी समितीने केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT