Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

नारायणराव आणि नितेशने शिवसेनेवर टीका करू नये : फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नारायण राणे हे बेधडक व्यक्तिमत्व आहेत. राणेंचा स्वाभिमान आम्ही विलीन करत नाही, त्यांचा स्वाभिमान सांभाळून आम्ही त्यांचा पक्ष आमच्यात विलीन करत आहोत. ते भाजपचेच खासदार आहेत. नारायणराव आणि नितेशला मी एक सल्ला दिला, की तुम्ही शिवसेनेविरुद्ध वक्तव्य करू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी साम वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शरद पवारांवर टीका  करत मित्रपक्ष शिवसेना आणि नारायण राणेंविषयी विविध प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. 

मुख्यमंत्री म्हणाले, ''शरद पवारांना 24 तारखेला जनता दाखवेल की खरा मल्ल कोण आहेत. आम्ही मोदींचे चेले असून, ते आमचे उस्ताद आहेत. या निवडणुकीतही आम्ही त्यांच्या पक्षाला चितपट करू. पवार हे 100 वर्षे नक्की जगतील. आमचे सरकार आणखी 20 वर्षे नक्की राहणार आहे. ते शतायुषी झाल्यानंतर त्यांचा सरकार आमच्या सरकारकडून करण्यात येईल. दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा माझ्या संकल्प आहे. कोकणात वाहून जाणारे पाणी आम्हाला उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात आणायचे आहे. तसेच तरुणाईच्या हाताला रोजगार द्यायचा आहे. राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची करायची आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे पुरावे असतील तर तुम्ही माझ्यावर आरोप करा. आजपर्यंत माझ्यावर आरोप झाले, पण एकही पुरावा नाही. त्यामुळे जनतेचा माझ्या पारदर्शक कारभारावर विश्वास आहे. आम्ही जे सांगितले, त्यापेक्षा जास्त केले आहे. कर्जमाफी आम्ही दिलेली आहे.''

सहिष्णुता हे हिंदुत्वाचे तत्त्व आहे. आम्ही राष्ट्रवादी आणि हिंदुत्व विचाराचे आहोत. देशविरोधी विचार मांडणाऱ्यांना आमचा कायम विरोध आहे. देशातील सर्व जनतेला कलम 370 हटविण्याचा आनंद झाला. फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्याला विरोध केला. पाच किंवा दहा रुपयांत थाळी देण्याची कोणतीही घोषणा आम्ही केलेली नाही. नोंदीत कामगारांसाठी फक्त 5 रुपयांत अटल थाळी सुरु केली आहे. आम्ही मेगाभरती केली नाही, फक्त बोटावर मोजण्याइतकीच लोक घेतली आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

MP EOW Controversy : एक वर्षाच्या बालकावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा पराक्रम

Chhatrapati Sambhajinagar News: अवकाळी पावसाचा मोठा फटका; हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

PM Kisan 22nd Installment : 'पीएम किसान'चे 93 कोटी खात्यात जमा झाले, पण 'या' चुकीमुळे 11 हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले; त्वरित करा हे काम!

SCROLL FOR NEXT