Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Pune Rain : पुणेकरांना तात्काळ मदत देवू : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुण्यात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला असून, अनेक जणांचे नुकसान झाले आहे. पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तात्काळ मदत देवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पुणे शहर व उपनगरात बुधवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. पुण्यातील कात्रज, सिंहगड रोड परिसरात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. तर, विविध ठिकाणी सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की पुणेकरांना सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे. काही जण वाहून गेले आहेत. एनडीआरएफच्या जवानांनी काही जणांना सुखरूप ठिकाणी पोचविण्यात मदत केली. मी सतत जिल्हाधिकारी आणि नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफची दोन पथके बारामतीलाही पाठविण्यात आली आहेत. बारामतीतील कऱ्हा नदीलाही पूर आला आहे. पुण्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्या कुटुंबीयांना सर्व मदत प्रशासनाकडून दिली जाईल. 

अनेक वर्षांनंतर असा एका रात्रीत पाऊस 
ढगफुटीसारखा पुण्यात पाऊस कोसळत होता. मी आणि जिल्हाधिकारी सतत चर्चा करत होतो. एनडीआरएफच्या पथकाकडून मदत करण्यात येत आहे. कात्रजजवळ महामार्ग पुन्हा सुरु करण्यात आला आहे. तर, शिवापूरजवळ काही जण वाहून गेले आहेत. अनेक वर्षांनंतर असा पाऊस झाला आहे. घटना घडलेल्या ठिकाणी प्रशासन मदत करत आहे. आलेल्या संकटाला आपल्याला तोंड द्यायचे आहे. नदीकाठच्या गावांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT