Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

उदयनराजे आमच्याकडे आल्यास आनंदच : फडणवीस 

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यापूर्वीही उघडपणे सांगितले आहे, की सातारा जिल्ह्यातील अनेक विकासाची कामे आमच्या सरकारच्या काळात झाली आहे. भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे स्वतः ठरवतील. ते आमच्याकडे आले तर आनंदच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज भुसावळमध्ये पोहचली असून, त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केले. या पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, गिरीश महाजन आदी प्रमुख नेते उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, की येत्या विधानसभा निवडणुकीत आमच्या महायुतीलाच जनता अभूतपर्व यश देईल. गेल्या पाच वर्षांत विरोधकांना सूरच सापडला नाही. एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना केंद्रात पाठवायचे की राज्यात ठेवायचे हे पक्षश्रेष्ठी ठरवत असतात. आजही ते आमचे मोठे नेते आहेत आणि मार्गदर्शक आहेत. मी महाराष्ट्रात खूश आहे. पण, पक्ष जे सांगतील ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे. राष्ट्रवादी अस्तित्वहिन होऊ लागला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाषणातून त्यांचे नैराश्य दिसत आहे.  

'सामना'वर मी कधीच बोलत नाही
सामनावर काय छापतात यावर मी कधीच प्रतिक्रिया दिल्या नाहीत. सामनाने यापूर्वीही 50 वेळा छापले आहे. पीक विम्याच्या संदर्भात खासगी कंपन्यांना फायदा होतो, असे मलाही वाटते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ACB Arrest Nashik : ZP च्या महिला अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक; आमदारांच्या तक्रारीनंतरही सुधारल्या नाहीत, कोण आहेत वैशाली ठाकरे?

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

Indian Army Rocket System: आता शत्रूंची खैर नाही! पोखरणमध्ये पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी; भारताच्या संरक्षणशक्तीला नवी उंची

'या' तारखेवर जन्मलेल्या लोकांचा एकमेकांशी असतो 36 चा आकडा ! भेटल्यावर भांडण होणारच

SCROLL FOR NEXT