Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : आता महायुतीच्या नेत्यांनी राजकीय वजन दाखवावे : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा

धुळे : विकासाच्या विविध योजनांमध्ये युती सरकारने भरीव कामगिरी केली. धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्या-त्या क्षेत्रातील महायुतीच्या नेत्यांकडे आहे. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडून आपले राजकीय वजन दाखवावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

धुळे जिल्ह्यातील नेर तालुक्यात आज (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री म्हणाले, ''विकासाला खरी दिशा पंतप्रधान मोदींनी दिली आहे. ते महाराष्ट्रासह देशात सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहेत. अमेरिकेतील दौऱ्यावेळी तेथील अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांनी दीड तास मोदींचे भाषण हजारो जनतेच्या साक्षीने ऐकले. त्यानंतर प्रभावित होऊन अमेरिकेच्या अध्यक्षांनी मोदी है वैश्विक नेते असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारताला महासत्ता होण्यापासून आता कोणी आडवू शकत नाही. ते फक्त मोदींमुळेच शक्य होणार आहे. महाराष्ट्रात 50 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून, शेवटच्या पात्र शेतकऱ्याला जोपर्यंत लाभ दिला जात नाही. तोपर्यंत कर्जमाफी योजना बंद केली जाणार नाही. आघाडी सरकारने सिंचनातून आपल्या तिजोरी भरल्या. पण, युती सरकारने जलयुक्त शिवार अभियानासह वेगवेगळ्या सिंचन योजनातून आणि केंद्रातून निधी मिळवून प्रकल्प पूर्णत्वाच्या माध्यमातून राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काम केले.''

महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीची वाटचाल पराभवाकडे होत आहे. पराभवाचे खापर आपल्या माथी फुटू नये म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला निघून गेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या 50 वर्षांतील सरकारच्या काळात जनतेशी खोटारडेपणा केला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

Kankavli Assault Case: गणपतीला माहेरी आली, जमिनीच्या वादातून आई-भावंडांसह पाच जणांकडून बेदम मारहाण

सासूसोबत जिनिलीयाचं खास बॉण्डिंग, घरच्या गणपतीची लगबग; देशमुख कुटुंबाचे फोटो व्हायरल

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

IND vs AFG, T20I: मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज! सॅमसनच्या कामगिरीकडे लक्ष, पाचव्या गोलंदाजाची चिंता कायम; कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT