CM Ekanth Shinde took aggressive action against Thackeray family uddhav thackeray Aditya thackeray mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरे कुटुंबीयांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या आमदारांचे शिंदेंनी कान टोचले

‘नको त्या विषयात नको तेवढे बोलू नका,’ असे बजावत आपल्या गटातील आमदारांना आवरण्यासाठी शिंदे यांना पुढाकार घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बंडखोरीनंतर ठाकरे कुटुंबीयांबाबत आक्रमक न होण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊनही काही आमदार हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर तुटून पडत असल्याची बाब शिंदे यांनी गांभीर्याने घेतली आहे. ‘नको त्या विषयात नको तेवढे बोलू नका,’ असे बजावत आपल्या गटातील आमदारांना आवरण्यासाठी शिंदे यांना पुढाकार घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

शिवसेनेत बंड पुकारल्यापासून शिवसेनेतील नेते आणि बंडखोरांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातून या दोन्ही गटांतील वाद टोकाला गेल्याचे दिसत आहे. परंतु बंडानंतरच्या पहिल्या काही दिवसांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांवर काहीही न बोलण्याची भूमिका शिंदे यांनी घेतली होती. ठाकरे यांच्याबाबत वैयक्तिक टीका केली जाणार नसल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही जाहीर केले होते. तरीही, आदित्य हे राज्यात फिरत असताना बंडखोरांवर हल्लाबोल करीत आहेत. त्यातही, ‘गद्दारांनो, राजीनामा देऊन निवडणुका सामोरे जा,’ असे आवाहन आदित्य करीत आहेत.

त्यावरून आदित्य आणि काही बंडखोर आमदार जुंपल्याचे पाहायला मिळाले. त्यातून ठराविक आमदार तर आदित्य यांना ‘टार्गेट’ करीत आहेत. त्याआधी शिंदे यांना सुरक्षा पुरविण्यावरूनही काही आमदारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.आपले मोजके आमदार हे रोज वादग्रस्त बोलत असल्याच्या तक्रारी काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यावर शिंदे यांनी बेजबाबदारपणे बोलणाऱ्या आमदारांचे कान टोचल्याचे समजते. शिंदे यांच्या शब्दापलीकडे नसलेले हे आमदारही आता ‘बॅकफूट’वर येण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

‘दुःखी असलात तरी फॅशनेबल दिसावं लागतं...’; प्रीती झिंटा कलाकारांबद्दल स्पष्टच बोलली, म्हणाली...

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT