Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी शिंदे-फडणवीस दिल्लीत! अजित पवार म्हणतात, मला माहितीच नाही

कार्तिक पुजारी

मुंबई- मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा तापू लागला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला चाळीस दिवसांचा वेळ संपलेला आहे. त्यामुळे जरांगे आता उपोषणाला बसले आहेत. यापार्श्वभूमीवर सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मला विचारुन दिल्लीला गेले का? शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याची मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावरुन त्यांनी असं वक्तव्य केलंय.(cm eknath shinde and devendra fadanvis tour to delhi on maratha reservation ajit pawar statement)

मला विचारुन ते गेले का? मी माहिती घेऊन सांगतो. मी सकाळी आलो तसा डायरेक्ट इथंच आलोय पुण्यावरुन. सकाळी दहा वाचल्यापासून मी इथंच आहे. त्यामुळे मला एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या दौऱ्याची माहिती नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली मध्ये जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचं बोललं जातंय. अशा वेळी एका महत्त्वाच्या मुद्द्यावरुन राज्याचे प्रमुख नेते दिल्लीला गेले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अजित पवारांना न सांगताच दोन्ही नेते दिल्लीला गेले का? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT