Shiv Sena disqualified MLA case 
महाराष्ट्र बातम्या

अपात्र आमदारांचा निर्णय होईना; CM शिंदे व नार्वेकरांची ‘वर्षा’वर बंद दाराआड चर्चा, नेमकं काय घडतय?

Sandip Kapde

Shiv Sena Disqualified MLA Case: सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडे बोल सुनावल्यानंतर नार्वेकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुपारी बैठक झाली. या बैठकीदरम्यान आमदार अपात्रतेबाबत चर्चा झाल्याचे समजते. मात्र मतदारसंघातील कामासंदर्भात ही भेट असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबई मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यासाठी नार्वेकर यांनी मतदारसंघातील कामात लक्ष घालण्यासही सुरुवात केली आहे.

आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांना ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी नवरात्रीच्या सुटीच्या काळात वेळापत्रकाबाबत विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता सुनावणीचे नवीन वेळापत्रक नार्वेकर यांना तयार करावे लागणार आहे. (Latest Marathi News)

हे वेळापत्रक न्यायालयात सादर झाल्यानंतर आमदार आपत्रतेबाबतचा निर्णयही लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्षांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT