eknath shinde and raj thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde:MH-04 गाड्यांना टोलमाफी मिळणार? ठाकरे-शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, निर्णय लवकरच सांगणार

मुंबईतील खाजगी गाड्यांना टोल आकारु नये,अशी मागणी राज ठाकरेंकडून करण्यात आली आहे.

Manoj Bhalerao

CM Shinde-Raj Thackrey Meet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यात 'सह्याद्री' अतिथीगृहात बैठक झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टोलनाक्याबद्दल असलेल्या आक्रमक भूमिका घेत असल्याने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, असं सांगण्यात येत आहे. मुंबईतील MH-04 नंबर असलेल्या गाड्यांना टोल माफी मिळण्याची शक्यता आहे.

वाशी आणि इतर टोलनाक्यांवर समिती नेमण्यात येणार आहे. १५ दिवसांपर्यंत या टोलनाक्याची व्हिडीओग्राफी केली जाईल आणि मुंबईतील एमएच-०४ गाड्या किती प्रमाणात येतात, याचा आढावा घेतला जाईल

सह्याद्री अतिथीगृहावरील ही बैठक संपल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी माहिती दिली की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला आहे, हे शुक्रवारी (दि.१३ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन जाहीर कऱण्यात येईल.

मागील काही दिवासांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टोलनाक्यांवर आंदोलन करण्यात येत होतं. काही कार्यकर्त्यांकडून टोलनाक्यांचं नुकसान देखील करण्यात आलं होतं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

INDW vs AUSW Live: स्मृती मानधना-शफाली वर्मा यांचा वर्ल्ड रेकॉर्ड! हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

SCROLL FOR NEXT