CM Eknath Shinde Birthday celebration in new york times square America photo goes viral  
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde Birthday : 'अनस्टॉपेबल सीएम'; शिंदेंच्या वाढदिवसाचं टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकलं बॅनर

सकाळ डिजिटल टीम

CM Eknath Shinde Birthday celebration : काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती. या बंडानंतर एकनाथ शिंदे हे नाव सर्वदूर परिचयाचे झाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ख्याती साता समुद्रापलिकडे पोहचल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचे समर्थक महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशात देखील पाहायला मिळत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त राज्यभर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेत जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्येएकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर झळकवत काही तरुणांनी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला. आता या तरुणांचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

एकनाथ शिंदे यांचा अमेरिकेत वाढदिवस साजरा करणारे हे उत्साही कार्यकर्ते ठाणे येथील युवासेना कोअर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांचे मित्र आहेत. अभिनव जैन, राजीव पंड्या, रुचिता जैन अशी या तरुणांची नावे आहेत.

तरुणांनी मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर्स तयार करून ते टाईम्स क्वेअर आणि ग्रँण्ड सेंट्रल येथे झळकवले आहेत. हे सर्वजण कामानिमित्त न्यू यॉर्क येथे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT