Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde:परभणी दौऱ्याहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट गुजरातला रवाना, कारण अद्याप अस्पष्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातला एका महत्वाच्या बैठकीसाठी गेले असल्याच्या चर्चा होत आहेत. गुजरातमधील अहमदाबाद येथे उतरून मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल लीला येथे थांबणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde Gujrat Visit:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी (दि.२७ ऑगस्ट) परभणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे गुजरातला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे गुजरातला का गेले? या मागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातला एका महत्वाच्या बैठकीसाठी गेले असल्याच्या चर्चा होत आहेत. गुजरातमधील अहमदाबाद येथे उतरून मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल लीला येथे थांबणार आहेत.

परभणीमध्ये रविवारी 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हजेरी लावली होती.(Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमात बोलताना विरोधकांना टोला लगावला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले की, मागच्या महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील दोन ते अडीच कोटी रुपये खर्च झाले होते. मागच्या एका वर्षात १०० कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला.

यावेळी शिंदेंनी इंडिया आघाडीवरही निशाणा साधला. पाटणामध्ये होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरही त्यांनी निशाणा साधला. "आपण पाटणपासून सुरूवात केली आणि काही लोकं पाटण्यामध्ये जमा झाले आणि तेथे द्वेषाची, स्वार्थाची खिचडी शिजवू लागले",असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

परभणीतील हा कार्यक्रम सुरु असताना पावसाने हजेरी लावली. कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांना पावसामुळे त्रासाला सामोरे जावे लागले. परभणीबरोबरचं बीडमध्येही पावसाने थैमान घातले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT