Eknath shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

"पंतप्रधान देवेंद्र फडणवीस..अर्रर्र..."; मुख्यमंत्री शिंदेंनी चावली जीभ

जवळपास महिना झाला तरी राज्यातलं सरकार फक्त मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच चालवतायत.

सकाळ डिजिटल टीम

शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून या दोघांच्या अनेक गोष्टी चर्चेचा विषय ठरल्यात. उदाहरणार्थ, माईक ओढणं, चिठ्ठी ठेवणं, एकत्र दौऱ्यांवर जाणं, भर पत्रकार परिषदेत हळूच कानात काहीतरी सांगणे. मात्र आता या सगळ्यासोबत आणखी एक गोष्ट चर्चेत आली आहे. ती म्हणजे एकनाथ शिंदेंच्या भाषणातला देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख. (CM Eknath shinde about Devendra fadnavis)

एकनाथ शिंदे (Eknath shinde)सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते नाशिकमध्ये पोलीस वसाहतीच्या उद्घाटनावेळी बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख चक्क देशाचे पंतप्रधान म्हणून केला. आता हे चुकून शिंदेंच्या तोंडून बाहेर पडलं. त्यामुळे लगेचच त्यांनी जीभ चावली आणि आपली चूक सुधारली. मात्र यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. गेल्या साधारण महिनाभरापासून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच सरकार चालवत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT