Shivsena  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, शिंदे-फडणवीस-पवार यांच्यामध्ये तासभर चर्चा; घडामोडींना वेग

Shiv sena Mla Disqualification Result: शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये काल(मंगळवारी) मध्यरात्री महत्वाची बैठक झाल्याची माहिती आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेना पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या ऐतिहासिक राजकीय पेचावर आज बुधवारी (ता. १०) सायंकाळी चार वाजता निकाल दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता ‘शिवसेना कोणाची’ आणि ‘ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटाचे?’ याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी चार वाजल्यानंतर सुनावणार आहेत. त्याआधीच घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये काल(मंगळवारी) मध्यरात्री महत्वाची बैठक झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे.

त्याचबरोबर या बैठकीसाठी राज्याच्या नवीन पोलीस महासंचालक रश्मी शुल्का देखील उपस्थित असल्याची माहिती आहे. तर या बैठकीमध्ये आज योणाऱ्या शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकालानंतर राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष होऊ नये, शांतता रहावी यासाठी काळजी घेतली जाणार आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना राज्य सरकारकडून काही महत्वाच्या सूचना देखील देण्यात आल्याचीही माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज ४ वाजता या निकालाचं वाचन करणार आहेत.

गेल्या दीड वर्षांपासून अत्यंत चर्चेच्या आणि राजकीय वादाच्या ठरलेल्या या मुद्द्यावरील निकालाकडे संपूर्ण राज्याचे आणि देशाचेही लक्ष लागले आहे. शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात दोन्ही गटांच्या याचिकांवर १४ सप्टेंबर ते २० डिसेंबरपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांसमोर मॅरेथॉन सुनावणी झाली होती. आज विधानसभा अध्यक्ष विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचे वाचन करणार आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यामध्ये शिंदे गटाच्या 16 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांचा समावेश आहे.

शिवसेना शिंदे गटाचे 16 आमदार

1) एकनाथ शिंदे

2) चिमणराव पाटील

3) अब्दुल सत्तार

4) तानाजी सावंत

5) यामिनी जाधव

5) संदीपान भुमरे

7) भरत गोगावले

8) संजय शिरसाठ

9) लता सोनवणे

10) प्रकाश सुर्वे

11) बालाजी किणीकर

12) बालाजी कल्याणकर

13) अनिल बाबर

14) संजय रायमूळकर

15) रमेश बोरनारे

16) महेश शिंदे

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार

1) अजय चौधरी

2) रवींद्र वायकर

3) राजन साळवी

4) वैभव नाईक

5) नितीन देशमुख

6) सुनिल राऊत

7) सुनिल प्रभू

8) भास्कर जाधव

9) रमेश कोरगावंकर

10) प्रकाश फातर्फेकर

11) कैलास पाटील

12) संजय पोतनीस

13) उदयसिंह राजपूत

14) राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: मंडणगडमधील महावितरणच्या जागेतील खैराची पुन्हा चोरी

SCROLL FOR NEXT