eknath shinde  sakal
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde : तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, नामांकित संस्था...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सुद्धा दक्ष राहण्याचे निर्देश आहेत, त्यामुळेच काल नाशिक येथे परीक्षा केंद्रावर तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेच्यावेळी तीन संशयितांना पकडण्यात यश आले.

या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, याविषयी कुणीही संभ्रम निर्माण करू नये व अफवाही पसरवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल परीक्षा केंद्रावरून पोलिसांनी तीन संशयितांना पकडले आणि त्यांच्याकडून टॅब, वॉकी टॉकी, मोबाईल फोन, हेडफोन असे साहित्य जप्त केले आहे.

त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडीही देण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत पारदर्शी आणि शिस्तबद्धरित्या पदभरतीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पूर्वीच्या काळात अशा स्पर्धा परीक्षांत काही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. सदोष भरती प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. म्हणूनच राज्य शासनाने टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांकडून या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्था काटेकोरपणे या परीक्षा घेतील. राज्य शासनाचे सर्व प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर हादरलं! झुंड चित्रपटात भूमिका केलेल्या कलाकाराचा खून; पोलिस म्हणाले...

Latest Marathi News Live Update : राज्याचा विकास वेगाने होत आहे- एकनाथ शिंदे

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Nashik News : नवीन नाशिकमध्ये 'एआय'चा धुमाकूळ! बिबट्याचे बनावट फोटो व्हायरल, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

PM Jeevan Suraksha : प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचा एक रुपयाचा फायदा नाही अन् सर्व सामान्यांकडून २५ कोटीहून अधिक रक्कम वसूल

SCROLL FOR NEXT