CM Eknath Shinde
CM Eknath Shinde esakal
महाराष्ट्र

Eknath Shinde : बंजारा समाजासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या मोठ्या घोषणा; संजय राठोडांबद्दल म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

वाशिमः बंजारा समाजाच्या पोहरावेदी देवस्थान येथे आज महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी संजय राठोड नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळेच आता पोहरादेवी संस्थानसाठी ५९३ कोटी रुपये विकासनिधी दिल्याचं त्यांनी सांगितलं.

पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, वसंतराव नाईक महामंडळाला कधीही निधी कमी पडू देणार नाही. ५० कोटी रुपये बंजारा महामंडळाला देणार असल्याचं सांगून त्यांनी नवी मुंबई येथे बंजारा भवन उभा करणार असल्याचं स्पष्ट केलं.

पोहरावेदी सेवाध्वजाचं लोकार्पण

  • एकनाथ शिंदे यांनी बंजारा भाषेतून भाषणाला सुरुवात केली

  • पोहरावेदी सेवाध्वजाचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं.

  • संत सेवालाल महाराज पुतळ्याचं अनावरण

काय म्हणाले एकनाथ शिंदे...

  • पोहरादेवीसाठी ५९३ कोटींचा विकासनिधी देण्यात येणार आहे

  • संजय राठोड पाठवुरावा करतात म्हणून समाजाचा प्रश्न मागे राहणार नाही

  • वसंतराव नाईक महामंडळाला पैसे कमी पडू देणार नाही, ही सरकारची जबाबदारी आहे

  • तांडा वस्ती सुधार योजना बळकटी देणार

  • ५० कोटी रुपये बंजारा महामंडळाला देणार

  • हे सरकार बंजारा समाजाच्या पाठिशी उभं राहणारं सरकार आहे

  • नवी मुंबईत बंजारा समाज भवन उभा करणार

  • संजय राठोड नेहमी समाजाच्या प्रगतीसाठी धडपडत असतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : छत्रपती संभाजी नगरमधल्या मतदान केंद्रावर EVM मशीन बंद

China-India Trade: हिंदी-चीनी भाई भाई! बहिष्कारानंतरही चीनमधून आयात वाढली, 100 अब्ज डॉलर्सची उलाढाल

Latest Marathi News Live Update : मुंबई- गोवा महामार्गावर एक तासापासून वाहतूक कोंडी

Gautam Gambhir: 'KKR मध्ये सूर्यकुमारच्या क्षमतेचा योग्य वापर...', गौतम गंभीरने बोलून दाखवलं मनातलं दु:ख

Sandalwood Oil : उजळ त्वचेसाठी अन् सुरकुत्यांना घालवण्यासाठी चंदनाचे तेल आहे फायदेशीर, असा करा वापर

SCROLL FOR NEXT