CM Eknath Shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री शिंदेंची प्रकृती बिघडली; सर्व प्रशासकीय बैठका रद्द

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सततच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे सर्व प्रशासकीय बैठका आणि दौरे रद्द करण्यात आले आहेत. राज्यात सुरू असलेले पाहणी दौरे आणि बैठका यामुळे त्यांना थकवा जाणवत असून डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला असल्यामुळे त्यांच्या आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शिंदे गटाचा आणि शिवसेनाच्या वाद सध्या सुप्रीम कोर्टात गेला असून यावर आता येत्या सोमवारी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि पक्षचिन्ह नेमकं कुणाचं आणि खरी शिवसेना कोणती असा वाद कायम राहिला आहे.

दरम्यान, हे सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक दौरे आणि बैठका घेतल्या आहेत. त्याचबरोबर पहाटेपर्यंतच्या सभा, पूरग्रस्त भागाची पाहणी आणि प्रवास या सर्व कामामुळे त्यांना थकवा आला असून त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून त्यांना आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आज राज्यात होणाऱ्या सर्व प्रशासकीय बैठका आणि सभा रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT