cm eknath shinde on uddhav thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी CM शिंदे आले धावून; मविआच्या सभेला जात असताना...

सभेच्या तयारीला जात असताना कार्यकर्त्यांचा भीषण अपघात

अंकिता खाणे (Ankita Khane)

नागपूरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली आहे. विदर्भातील आघाडीची ही पहिलीच सभा असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष तिकडे लागलं आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले होते. मात्र, या कार्यकर्त्यांचा भीषण अपघात झाला.

या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. ही माहिती मिळताच पक्षभेद बाजूला ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीसाठी धावून गेले. या कार्यकर्त्यांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश त्यांनी डॉक्टरांना दिले. शिंदे यांचा हा दिलदारपणा पाहून त्यांचं कौतुक केलं जात आहे.

महाविकास आघाडीची 16 एप्रिलला नागपूरमध्ये सभा होणार आहे. या वज्रमूठ सभेची महाविकास आघाडीकडून तयारी सुरू केली आहे. सभेसाठी ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते नागपूरला जात होते. पण समृद्धी महामार्गावर या कार्यकर्त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले. तर काही जण जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून जखमी कार्यकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

ठाकरे गटाच्या या कार्यकर्त्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षभेद विसरून या कार्यकर्त्यांना मदत केल्याने मुख्यमंत्र्यांच्या या दिलदार वृत्तीचं कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT