Cm Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : "आम्ही आहोत..."; लाँग मार्चमधल्या मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला Cm शिंदेंचा भावनिक आधार

या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतही देण्यात आली आहे.

वैष्णवी कारंजकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लाँग मार्चमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत केली आहे. याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तसंच त्यांनी कुटुंबीयांना दिलासाही दिला आहे.

याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शेतकऱ्याच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत केली. त्यानंतर कुटुंबीयांना भावनिक आधार देताना शिंदे म्हणाले की, पुढे काहीही मदत लागली तर संपर्कात रहा. आम्ही आहोत. दुर्दैवाने ही घटना घडली. पण आम्ही आहोत तुमच्यासोबत."

शेतकरी, कष्टकरी आणि अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी लाँग मार्च काढला होता. या मार्चमधील एका शेतकऱ्याची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्या शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल केलं परंतु त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुंडलिक अंबादास जाधव (वय ५५ वर्षे) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. पुंडलिक जाधव हे माहुडी (तालुका दिंडोरी, जि.नाशिक) येथील रहिवासी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन येत्या ११ जूनला होणार

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT