Chief Minister Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde Decision: मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! वेळेपूर्वीच खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; पत्रकार परिषदेत माहिती

Maharashtra Government: राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत शब्द दिला होता. ३ कोटी रुपये पाठवण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतात, असा एक प्रचार शिवसेनेकडून सातत्याने केला जातो. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळल्याचा प्रसंग सोमवारी आणखी एकदा अनुभवता आल्याचं बोललं जातंय. सरकारच्या या निर्णयामुळे अनुदानापोटी ३ कोटी रुपये खात्यावर पाठवण्यात आलेले आहेत.

आषाढ वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटी सुपूर्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यंदा प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंड्यांना प्रत्येकी २०००० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. परतवारीपूर्वीच याची पूर्तता झाल्याने लाखो वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे ह.भ.प. अक्षय महाराज भोसले म्हणाले.

सोमवारी परतवारीच्या निमित्ताने ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी वारकरी आणि दिंडी प्रमुखांच्या वतीने शासनाचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी यंदाच्या आषाढी वारीतील सुविधांसाठी प्रशासकीय निर्णय घेतेल ते अभूतपूर्व आहेत. त्यामुळेच यंदाचा आषाढी वारी सोहळा वारकऱ्यांच्या दृष्टीने सर्वार्थाने आनंददायी ठरला, असे भोसले महाराज म्हणाले.

सरकारने यंदा वारकरी दिंड्यांसाठी प्रत्येकी २०००० रुपयांचे सानुग्रह देण्याची घोषणा केली होती. मागील ७ दिवसात दिंडी प्रमुखांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. दिंडींना सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणाच केली नाही तर ते पैसे शासनाकडून लाभार्थ्यांना मिळाले की नाही याचीही शहानिशा केली. ह.भ.प. अक्षय महाराज भोसले पुढे म्हणाले की, वारीच्या तीन दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात स्वत: उपस्थित राहून वारीचे नियोजन केले. वारीत सहभागी लाखो वारकऱ्यांना यंदा पिण्याचे शुद्ध पाणी, फळांचा रस, आरोग्याची वारी, निर्मल वारी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या , अशी माहिती भोसले यांनी दिली.

वारीत निधन पावलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने पाच लाख रुपयांची मदत करत आहे. विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात वारीत सहभागी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाखो फॉर्म वितरित करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली.

''मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे वारकरी संप्रदाय खुश आहे. शिवसेना पक्ष म्हणून वारीत वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी वारकरी महामंडळ स्थापन केलं आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना.. असे अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत . हे सरकार वारकऱ्यांचे आहे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे. काहींनी वारकऱ्यांना मदत करण्याचे ढोंग केले. तर काहीजण फोटो सेशनसाठी वारीमध्ये चालले.'' अशी टीका भोसले यांनी विरोधकांनावर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची 'जबरा फॅन' बनली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली- अनेकदा प्रामाणिकपणाची मोठी किंमत चुकवावी लागते

Pandavkada Waterfall: पांडवकडा धबधब्यावर पुन्हा मोठी दुर्घटना! मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

IND vs SL 1st Test: मालिका सुरू होण्यापूर्वीच गौतम गंभीरची फलंदाजाला धमकी? चांगला नाही खेळलास तर संघाबाहेर करेन... एकच खळबळ

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

Career Numerology: IT, कोडिंग ते रिसर्च; अंकशास्त्रानुसार 'या' ४ मूलांकाच्या लोकांना मिळते परदेशात नोकरी!

SCROLL FOR NEXT