Ram Mandir_Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: CM एकनाथ शिंदेंच्या 22 जानेवारीच्या अयोध्या दौऱ्याबाबत संभ्रम! काय घडलंय नेमकं? वाचा

सोमवारी २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : सोमवारी २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. पण या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार नाहीत. पण असा निर्णय त्यांनी का घेतला आणि नंतर कधी राम मंदिराला भेट देणार याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. (CM Eknath Shinde will not go to Ayodhya on January 22 What exactly happened need to know)

मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलंय की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम आणि दयाळू नेतृत्वाखाली अब्जावधी भारतीयांचे, रामभक्तांचे तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले आहे. 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचा अभिषेक केला जाईल. मी महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार मानतो. (Latest Marathi News)

या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केले आहे. माझ्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार असतील. संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्तांना सोबत घेऊन भगवान श्रीरामाचं दिव्य दर्शन घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. अयोध्येत दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवू!

मुख्यमंत्र्यांनी या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी "अयोध्येत दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवू" असं म्हटल्यानं ते २२ तारखेला अयोध्येला जाणार नसल्याचं सुचित होत आहे. पण नंतर आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबत कधी भेट देतील हे मात्र स्पष्ट केलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad: ''गौरव मोरेसुद्धा घाबरलेला'', प्रवीण गायकवाडांचा धक्कादायक खुलासा

Nishikant Dubey : मराठी जनतेचा अपमान; मनसेची खासदार निशिकांत दुबे यांना मानहानीची नोटीस

'वॉर 2' चा धमाकेदार पोस्टर रिलीज, हृतिक, ज्युनियर एनटीआर, कियाराची जबरदस्त झलक!

Buldhana Crime : अनैतिक संबंधातून विवाहितेचा खून; पेनटाकळी धरणात आढळला होता मृतदेह, आरोपीला अटक

Latest Maharashtra News Updates : 'प्रधानमंत्री धन-धनय कृषी योजने' ला मंत्रिमंडळाची मंजुरी

SCROLL FOR NEXT