Ashadhi Ekadashi esakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Ekadashi : बीडचे नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

यंदा मानाचे वारकरी म्हणून नवले दाम्पत्यांना मान मिळालाय.

सकाळ डिजिटल टीम

यंदा मानाचे वारकरी म्हणून नवले दाम्पत्यांना मान मिळालाय.

Ashadhi Ekadashi 2022

पंढरपूर : विठूरायाच्या दर्शऩ रांगेतील एका वारकरी दाम्पत्याला वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजेत सहभागी होण्याचा मान दिला जातो. यंदा हा मान बीडच्या मुरली बबन नवले (वय 52) आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले (वय 48) या शेतकरी दाम्पत्यास मिळाला. त्यांचा सत्कार CM एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते करण्यात आला.

नवले यांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा आहे. 1987 पासून गेली बारा वर्षे मुरली नवले हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या सोबत पंढरीच्या वारीत सहभागी होत आहेत. पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आगमन झाले. प्रारंभी श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्मिणीमातेची षोडशोपचार पूजा करण्यात आली.

पूजेचा मान मिळालेल्या वारकरी दाम्पत्याला राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एक वर्षभर मोफत प्रवासाचा पास दिला जातो. या प्रथेनुसार हा पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवले दाम्पत्यास सुपुर्त करण्यात आला.

३५ वर्षांपासून आम्ही वारी करतोय आम्हाला खूप आनंद वाटला. कधी असं वाटलं नव्हतं असं होईल, अशी भावना मानाचे वारकरी मुरली नवले यांनी व्यक्त केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी आपली विचारपूस केल्याचंही त्यांनी सांगितलं. आमच्यावर अशीच कृपा ठेव, खूप आनंद मिळाला, अशी प्रार्थनाही त्यांनी पांडुरंगाकडे केली. तर असं काही होईल हे आमच्या मनातही आलं नव्हतं, अशा शब्दांत त्यांच्या पत्नी जिजाबाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या प्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार बंडू जाधव, त्याच बरोबर आमदार भरत गोगावले, तानाजी सावंत, दिपक केसरकर, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडे, दादा भुसे, संजय राठोड, सचिन कल्याणशेट्टी, रविंद्र फाटक , आकाश फुंडकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. श्री विठ्ठल रुक्मिणीस दोन किलो वजनाचे सोन्याचे आकर्षक मुकुट दान केल्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील सराफ व्यापारी विजयकुमार उत्तरवार व उत्तरवार यांचा सत्कार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. विठ्ठल निर्मल दिंडी स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या दिंड्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्हे शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

श्री विठठल रुक्मिणीला आकर्षक पोषाख

आषाढी एकादशीला श्री विठूरायाला घालण्यासाठी मनमोहक रेशमी अंगी, रेशमी पितांबर आणि श्री रुक्मिणीमातेला घालण्यासाठी रेशमी आकर्षक पैठणी .शिंदे यांच्या वतीने मंदिर समितीकडे शनिवारीच सुपुर्त करण्यात आली होती. हा पोषाख आज श्री विठ्ठल रुक्मिणीस परिधान करण्यात आला होता. या पोशाखात सावळ्या विठ्ठलाचे रुप अधिक खुलून दिसत होते.

चंद्रभागेतिरी स्नानासाठी गर्दी

आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी पहाटे चार वाजल्या पासून मोठी गर्दी केली होती. त्यामुळे चंद्रभागेचा तिर लाखो वारकऱ्यांनी फुलून गेला होता. नदीत स्नान करुन वारकरी गडबडीने दर्शऩ रांगेकडे जात होते तर काही टाळ मृदंगाच्या गजरात नगर प्रदक्षिणेच्या सोहळ्यात सहभागी होत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईत आतापर्यंत कुणाला किती जाता? वाचा पक्षनिहाय यादी

Maharashtra Municipal Election Results 2026 : मराठवाड्यातही महायुतीची सरसी ! छ.संभाजीनगरमध्ये भाजप आघाडीवर तर शिवसेना 'इतक्या' जागांवर पुढे

Tejaswi Ghosalkar: पतीची हत्या, निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची साथ सोडली; भाजपच्या तिकिटावर विजयी

Malegaon Municipal Election Result 2026 Won Candidate : मालेगावात मोठा राजकीय उलटफेर; महापालिकेत कुणाची बाजी? वाचा विजयी उमेदवारांची यादी

Ichalkaranji Election Result : इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

SCROLL FOR NEXT