CM Eknath Shinde News esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची नवी खेळी; शिवसेनेच्या प्रचारासाठी बनवणार नवी रणनिती

एकनाथ शिंदेंकडून पक्षाच्या प्रचारासाठी जोरदार हालाचाली सुरू

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात सत्तासंघर्ष झाला. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांनी शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर शिंदे समर्थक आमदार आणि भाजप यांनी मिळून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं. या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेना पक्ष आता अधिकृतरित्या शिंदे गटाचा झाला आहे.

अशातच सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी जवळजवळ पूर्ण झाली आहे. न्यायालयाने अंतिम निकाल राखून ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पक्षाच्या प्रचारासाठी जोरदार हालाचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेच्या प्रचारासाठी नवी रणनिती आखली जात आहे.

इतकेच नव्हे तर शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी नवी रणनिती काय असावी? हे ठरवण्यासाठी एका सल्लागार समितीची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांच्याकडे या सल्लागार समितीची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. नव्या शिवसेनेच्या प्रचारासाठी ही समिती नेमण्यात आली आहे.

पक्षाची नवी रणनिती काय असावी? हे ठरवण्यासाठी एका सल्लागार समितीची नेमणूक करण्यात येणार आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांच्याकडे या सल्लागार समितीची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT