Eknath Shinde News 
महाराष्ट्र बातम्या

सरकार पाडू-पाडू म्हणणाऱ्यांचे ज्योतिषी संपले अन् अजित पवार इकडं आले ; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला

Sandip Kapde

Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डीमध्ये आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात संबोधित केले. हा कार्यक्रम सर्वसामान्यांसाठी असल्याचे शिंदे म्हणाले. हा राजकीय मेळावा नाही असे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले. शेतकरी, कष्टकरी यांचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना शिंदेंनी केली. मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था वाढली असेही त्यांनी सांगितले.

केंद्राचा राज्य सरकारला पाठिंबा आहे. राज्याच्या सर्व मागण्या मान्य होतात. शिर्डीत जगभरातून साईभक्त येतात. समृद्धी महामार्गामुळे शिर्डीचा विकास होणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव मिळाला पाहीजे म्हणून सरकारचे उपाय सुरु आहेत. दिवसा वीज देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे शिंदे म्हणाले.  

कुठल्याही शासकीय हॉस्पिटलमध्ये आता एकही रुपया भरावा लागणार नाही. मोफत उपचार मिळणार आहेत. कुटुंबाच्या आजाराजी काळजी आता सरकार घेणार आहे. सर्व अटी-शर्ती आता काढून टाकल्या आहेत. ५ लाखांपर्यंत खर्च सरकार करणार आहे. महात्मा फुले योजनेअंतर्गत ही सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. (latest marathi news)

विरोधक रोज सकाळी प्रार्थना करतात की एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री पद जाऊद्या. आधी म्हणाले सरकार पडेल. मात्र सरकार पाडू-पाडू म्हणून त्यांचे ज्योतिषी संपले आणि अजित पवार इकडे आले. सरकारच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत. आम्हाला किती पाण्यात बघाल?. झोपता उठता तुम्हाला आम्ही दिसतो. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, जनता आमच्या सोबत आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT