Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Video: CM शिंदेंच्या भाषणाआधीच सभेतून लोक निघाले; नेत्यांना आवरतं घ्यावं लागलं भाषण

सकाळ डिजिटल टीम

जळगाव - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शिंदे यांची मुक्ताईनगर येथे सभा झाली. मात्र या सभेला उपस्थित राहिलेले लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाआधीच सभास्थळावरून बाहेर पडू लागले. त्यामुळे प्रमुख नेत्यांना आपलं भाषण आवरतं घ्यावं लागलं. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

सभेतून लोक बाहेर जाताना पाहून मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचं भाषण आवरतं घेतलं. त्यानंतर गिरीश महाजन यांनी देखील आपलं भाषण आवरतं घेतलं. सभेला उपस्थित माता-भगिनींमध्ये चलबिचल दिसत आहे. वेळही खूप झाला आहे. त्यामुळे मी देखील भाषण आवरतं घेतोय, असं म्हणत महाजन यांनी भाषण थांबवलं.

यावेळी एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, सभेला आणलेली माणसं भाड्याने आणलेली नाहीत. अपक्ष आमदार असताना एवढा मोठा जनसमूदाय कार्यक्रमाला हजार राहिला. यावेळी शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरही टीका केली. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT