CM eknath shinde on not talking to devendra fadnavis for 9 minutes and Shivsena Advertisement  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : ती जाहिरात विरोधकांनी दिली होती का? CM शिंदेंनी दिलं ९ मिनिटाच्या अबोल्यावर स्पष्टीकरण

रोहित कणसे

शिवसेनेने राज्यातील प्रमुख वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यात ठिणगी पडणर असल्याच्या चर्चा सुरू राजकीय वर्तुळात सुरू होत्या. यानंतर काल, १५ जून रोजी पालघर येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले.

पण या दोघांमध्ये जवळपास दहा मिनीटं कसलाच संवाद झाला नाही, यावरून पुन्हा चर्चांना उधाण आलं. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आधीचं सरकार घरी होता आत्ताचं सरकार लोकांच्या दारी जातंय हा फरक आहे. सगळं साहित्य दाखले आपण लोकांना देतोय हे तुम्ही दाखवत नाहीत. काल नऊ मिनीटं काही बोलले नाहीत, अबोला हे काही जणांनी दाखवलं. मात्र आम्ही जोरजोरात हसलो, चांगल्या गप्पा मारल्या त्या तुम्ही दाखवल्या नाहीत, असा टोला त्यांनी माध्यमांना लगावला.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे तुटेल, युती एवढी कमजोर नाहीये. ही युती वेगळ्या वैचारिक भूमिकेतून केलेली आहे. बाळासाहेबांनी ही युती अटलजी होते तेव्हापासून केली. वर्षभरामध्ये यामध्ये जो कोणी मिठाचा खडा टाकला होता तो आम्ही खड्यासारखा काढून फेकून दिला.

मात्र शिवसेनेची जाहिरात कोण दिली त्याचं नाव विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. यानंतर ती जाहिरात विरोधकांनी दिली होती का? असा थेट प्रश्न माध्यमप्रतिनीधींनी विचारला, यावर बोलताना एकनाथ शिंदे हसून असू द्या ना असं उत्तर दिलं. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, पण आमच्यामध्ये जाहिरातीमुळे वितुष्ट येणार नाही. देवेंद्रजी आणि माझी दोस्ती एकदम जोरदार आहे, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT