Chief Minister Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: ''तुमचे लाडके भाऊ कुठे आहेत? आत्मपरीक्षण करा'', एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंबद्दल दिले 'हे' संकेत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या लाडका भाऊ, या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही लेक लाडकी ही योजना आणलीच आहे, तशी लाडकी बहीण योजनाही आणू.. पण असं बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत?

संतोष कानडे

Maharashtra Monsoon Session : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी लाडका भाऊ योजना आणा, असं आवाहन सरकारला केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

''लाडकी बहिण योजना तुम्ही आणत असाल तर मी त्याचं स्वागत करतो. पण लाडका भाऊ अशी योजना पण आणा. जसं माझ्या माता-भगिनींना तुम्ही लाभ देता तसंच माझ्या भावांना देखील तुम्ही लाभ मिळवून द्या. आता तो जुना काळ गेला, आता महिला देखील कर्तुत्ववान आणि सक्षम झालेल्या आहेत. जसं घराचा कर्ता पुरुष असतो तशाच आता महिला देखील घराच्या कर्त्या झालेल्या आहेत. त्यामुळं महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता या योजना दोघांसाठी तुम्ही आणा.'' असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

एकनाथ शिंदेंची बोचरी टीका

उद्धव ठाकरेंच्या लाडका भाऊ, या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही लेक लाडकी ही योजना आणलीच आहे, तशी लाडकी बहीण योजनाही आणू.. पण असं बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत?

''असं बोलणाऱ्यांनी विचार करावा, आत्मपरीक्षण करावं.. आम्ही सगळ्या भावांचा आणि बहिणींचा विचार करणारे आहोत.. तुम्हाला कळेलच.'' असं म्हणत एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंबद्दल सूचक विधान केलं. उद्धव ठाकरेंना चिमटा आणि राज ठाकरेंना काहीतरी देणार; असा सूर त्यांच्या बोलण्यातून निघत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT