Eknath Shinde and Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde News : 'त्यांनी हसतमुखाने दुसरा उपमुख्यमंत्री देखील स्वीकारला…'; CM शिंदेंकडून फडणवीसांच्या मोठेपणाचं तोंडभरून कौतुक

रोहित कणसे

नाशिक येथे आज (१५ जुलै) शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आले होते, या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांना दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका देखील केली. नाशिकमध्ये आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, काही लोकांना वाटतं आता तीन जण एकत्र आलेत, कसं होणार? आम्ही सगळे समजूतदार आहोत, मी आणि देवेंद्रजी अनेक वर्षांचे मित्र आहोत. त्यांनी पाच वर्ष यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम केलं. त्यांच्या मंत्रिमंडळात मी देखील मंत्री होतो.

आता मी मुख्यमंत्री म्हणून काम करतोय आणि ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सरकारमध्ये आलेत. मी खरं सांगतो देवेंद्रजींचं मन फार मोठं आहे. मुख्यमंत्री राहिलेला माणूस, मी त्यांना उपमुख्यमंत्री समजत नाही. माझे सहकारी, माझे सोबती समजतो आणि आम्ही त्यांचा अनुभव राज्यासाठी वापरण्याचे ठरवले आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, अजितदादा हे देखील उपमुख्यमंत्री झाले. ते (देवेंद्र फडणवीस) स्वतः उपमुख्यमंत्री असताना त्यांनी हसतमुखाने दुसरा उपमुख्यमंत्री देखील स्वीकारला. हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांच्यावर कलंक लावण्याचं काम काहीजण करतात. राजकारणातला आणि आमच्या युतीतला कलंक नाही तर निष्कलंक माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव अभिमानाने घेतलं पाहीजे. पण तेवढा मोठेपणा, दिलदारपणा असावा लागतो. पण कोतीवृत्ती, कद्रूपणा असलेल्या व्यक्तीकडून ते शक्य नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरेंना टोला

या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, घरी बसून राहण्यासाठी सत्ता नसते, ही सत्ता लोकांच्या घरापर्यंत जाण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी असते असं मानणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी आम्ही आहेत. घरी जे बसतात, घरातून जे काम करतात त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलू इच्छित नाही. पवार साहेबंनी त्यांच्या पुस्तकात लिहून टाकलं आहे. त्यामुळे घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवून टाकते. लोकांमधल्या कार्यकर्त्यांना लोकमध्ये येण्याची संधी देते असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT