CM eknath shinde reaction on ajit pawar comment on dharmaveer sambhaji maharaj  Sakal
महाराष्ट्र बातम्या

"आता आम्ही काय करायचं त्यांच्यावर…"; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर CM शिंदेचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते या विधानावरून नवा वाद पेटलाआहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांसारख्या व्यक्तीने असं बोलणं योग्य नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

अजित पवार यांच्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "ही राजकारण करण्याची वेळ नाही. बोलताना सगळ्यानी माहिती घेऊन तारतम्य बाळगून बोललं पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी या देशासाठी, धर्म आणि स्वराज्यासाठी बलिदान दिलं आहे. जेव्हा औरंगजेब त्यांचे हाल करत होता, कातडी सोलली, डोळे काढले शरीराचे तुकडे केल तरी देखील धर्म आणि स्वराज्याशी तडजोड केली नाही. धर्मवीर ही पदवी आम्ही-तुम्ही दिलेली नाही." असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "अनेक वर्षापासून त्यांना धर्मवीर म्हणातात. त्यामुळे अजितदादांसारख्या माणसाणे असं बोलण योग्य नाही, त्यांनी माहिती घेऊन बोलायला पाहिजे." असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. "त्यांनी महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांवर मोठी टीका केली होती. आता आम्ही त्यांचं काय करायचं. हे वक्तव्य निंदाजणक आहे" असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले होते?

आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही.'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा.छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते,धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, अशी भूमिका नागपूर मधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी मांडली होती. यावरुन आता वाद निर्माण होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Palkhi Accident : तापाच्या गोळ्या घेतल्या, चक्कर आली अन्... जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचे धक्कादायक कारण समोर

'तिला मी आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं का म्हणाले... Viral Video

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Almatti Dam Update : 24 तासांत बदलली परिस्थिती! कोल्हापूर-सांगलीकरांना मोठा दिलासा; 'आलमट्टी'तून पाणी सोडणं पूर्णपणे बंद, कृष्णेची पातळी स्थिर राहणार?

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT