CM Eknath Shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde : पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार का? मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

मागच्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक असे प्रकल्प गुजरातला नेले जात असल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.

रोहित कणसे

मागच्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक असे प्रकल्प गुजरातला नेले जात असल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. यादरम्यान आणखी एक पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याची चर्चा होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून हा प्रकल्प राज्याचा असून तो राज्याबाहेर जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, केसरकर इथं आहेत. मी सकाळी मंत्री उदय सामंत यांच्याशी बोललो आहे. हा आपल्या राज्याचा प्रकल्प आहे आणि तो राज्यातून बाहेर जाणार नाही याची खात्री बाळगा.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं की, एमटीएचएल (Mumbai Trans Harbour Link) चं १२ तारखेला प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे, एमटीएचएल हा देशातील २२ किलोमिटरचा सिंगल लाँगेस्ट सी ब्रीज आहे. यामुळे दोन तासांचं अंतर १५ ते २० मिनीटांवर येणार आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होईल. प्रदुषण कमी होईल. हा गेम चेंजर प्रकल्प आहे. तिथं महामुंबई तयार होईल आणि यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पाणबुडी प्रकल्प काय आहे?

२०१८ मध्ये सिंधुदुर्गामध्ये पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली होती. त्यानुसा सिंधुदुर्गच्या निवती रॉक्सजवळील समुद्रामध्ये पाणबुडी प्रकल्प येणार आहे. २०१८ मध्ये महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पर्यटन विकासासाठी १ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती.

सिंधुदुर्गमधील प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना खोल समुद्राच्या पाण्यातील अंतरंग अनुभवता येणार आहे. मात्र हा प्रकल्प आता गुजरातला गेला असून तो गुजरातेतील द्वारका येथे होणार असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. इतकेच नाही तर गुजरात सरकारने त्यासाठी माझगाव डॉक लिमिटेडसोबत करार केला असल्याचेही बोलले जात आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

SCROLL FOR NEXT