CM Eknath Shinde reaction to Devendra Fadnavis photo not being in the Shivsena advertisement  
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : "आम्ही दोघंही लोकांच्या मनात…"; जाहिरातीबाबत CM शिंदेंच्या विधानाने आश्चर्य

रोहित कणसे

एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेकडून राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमघ्ये 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची जाहिरात आज, १३ जून रोजी देण्यात आली आहे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. दरम्यान जाहिरातीत मोदींचा फोटो आहे पण फडणीस तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो गायब असल्यावरून चर्चांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो जाहिरातीतून गायब असल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांनी मनापासून अभिनंदन केलं आहे, त्यामुळे फोटो असो किंवा नसो, आम्ही दोघंही लोकांच्या मनात आहोत हे महत्वाचं आहे.

शिवसेना भाजप युती ही बाळासाहेबांच्या विचारांवर झालेली युती आहे. ही वैचारिक युती आहे. ही स्वार्थासाठी, सत्तेसाठी झालेली नाही. नागरिकांच्या मनात असेलेली युती आहे.

पुढे बोलताना, शिवसना भाजपा महायुती ही आगामी लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पूर्ण ताकदीने विकासाच्या मुद्द्यावर जिंकेल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

पीएम मोदींचा फोटोबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, पंतप्रधानाना देशानेच नाहीतर जगाने पसंती दिली आहे. ते जगात नंबर एकवर आहेत. अनेक मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्था संकटात आहेत. पण भारताची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचं काम मोदींनी केलं आहे. डबल इंजीन सरकारमुळे राज्याला खूप फायदा होत आहे. म्हणून मी देखील पंतप्रधानांचं अभिनंदन करतो.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, या जाहिरातीत पंतप्रधान मोदींचा फोटो देण्यात आला, मात्र बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कुठे दिसत नाही. म्हणजे ही सेना कोणाची आहे? ही मोदी सेना आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला भाजपपेक्षा जास्त मान्यता मिळाली याचा तु्म्हाला इतका मोठा आनंद झाला आणि या आनंदाच्या क्षणात बाळासाहेबांना विसरलात? कोट्यवधींच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंचा साधा उल्लेख देखील नाही. म्हणजे ही शिवसेना शिवसेना नसून मोदी-शाहांची सेना आहे हे आज स्पष्ट झालं आहे असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

जाहिरातीत काय म्हटलंय?

राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे, अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळालं आहे.

मतदान सर्वेक्षणानुसार भारतीय जनता पक्षाला ३०.२ टक्के टक्के आणि शिवसेनेला १६.२ टक्केजनतेने कौल दिला. म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४ टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणासाठी इच्छुक आहे.

या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील २६.१ टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ४९.३ टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली. महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार, असे जाहिरातीमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: उजनी धरणातून विसर्ग वाढविला, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT