Samruddhi Expressway  esakal
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा 'या' महिन्यात पूर्ण होणार; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

संतोष कानडे

शिर्डीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असतांनाचा एक किस्सा सांगितला.

यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, समृद्धीची संकल्पाना देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. सुप्रीम कोर्टाने जसा आपल्या सरकारचा मार्ग जसा मोकळा केला तसाच आपण समृद्धी महामार्गाचा मार्ग मोकळा केला आहे. शेवटचा शंभर किलोमीटरचा टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी माझ्याकडे काही कामच नव्हतं. तेव्हा फडणवीसांनी सांगितलं, असं काम देतो दुसरं काम करण्याची गरजच पडणार नाही. तेव्हा त्यांनी माझ्याकडे समृद्धी महामार्गाचं काम दिलं अन् मीही रस्त्यावर उतरुन काम केलं.

पुढे बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, अनेक अडथळे आले, विरोध केला गेला परंतु आम्ही अडचणीतून मार्ग काढून पुढे जात राहिलो. शेतकऱ्यांना तीन तासांमध्ये आम्ही पैसे देण्याचं काम केलं, त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढत गेल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

समृद्धी महामार्गाचा शेवटचा आणि तिसरा टप्पा येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. हा शंभर किलोमीटरचा टप्पा आहे. यासह राज्यात सुरु असलेले प्रकल्प वेळेत किंबहुना वेळेच्या अगोदर पूर्ण करण्याचं आश्वासन शिंदेंनी दिलं.

शिर्डी ते इगतपुरी हा ८० किलोमीटरचा हा टप्पा आहे. याचा फायदा मुंबई आणि आसपासच्या शहरातून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांना या महामार्गाचा लाभ होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल. नागपूरहून इगतपुरीपर्यंत आता नॉनस्टॉप प्रवास करता येणार आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. त्यानंतर आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर, नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावापर्यंतचा एकूण ६०० किमीचा रस्ता खुला झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT