cm eknath shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

MLC Election Result: "लोकसभेला फसवून मतं घेतली त्याची सूज आता उतरायला लागली"; विजयानांतर CM शिंदेंचा मविआवर हल्लाबोल

MLC Election Result : विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ उमेदवार निवडून आले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

MLC Election Result : विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना मविआवर हल्लाबोल केला. लोकसभेला फसवून मतं घेतली त्याची सूज आता उतरायला लागली आहे, असं त्यांनी म्हटलं.

आजचं अधिवेशन हे शवेटचं अधिवेशन होतं. गेल्या दोन वर्षात महायुतीचं काम आणि मविआचं अडीच वर्षांचं काम जर आपण पाहिलं तर सर्व घटकांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारनं केलं. आज मोठा विजय महायुतीला मिळाला आहे. खरं म्हणजे महायुतीचे सर्व ९ जागा जिंकणार असा विश्वास आम्ही व्यक्त केला होता. यासाठी सर्व मतदारांना मी धन्यवाद देतो. इतर आमदारांनी आम्हाला मदत केली त्यांचं मी अभिनंदन करतो. एक चांगली सुरुवात आज झालेली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री मविआवर हल्लाबोल केला.

लोकसभेनंतर जे काही नरेटिव्ह पसरवून लोकसभेत लोकांना फसवून यांनी मतं घेतली होती त्यामुळं आलेली सूज आता उतरु लागली आहे. हा विजय महायुतीचा एक ट्रेलर आहे, सुरुवात चांगली झाली आहे. त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता आम्हाला मदत करेन.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत आम्ही गुगलीच टाकला नाही तर चांगली बॅटिंगही केली आहे. महायुतीच्या ज्या आमदारांनी आम्हाला मतं दिली त्यांचं तर मी अभिनंदन करतोच पण विरोधी आमदारांनी मतं दिलीत त्यांचंही मी अभिनंदन करतो. बरोबर दोन वर्षांपूर्वी अशाच निवडणुकीत आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील निर्णय घेतला होता. स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले होते, त्यावेळी आम्ही मविआचं सरकार पलटवलं होतं, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Stock Market Today : जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; सोनं मात्र तेजीत; कोणत्या शेअर्सला फटका?

T20 World Cup : बांगलादेशची ICC कडून कोंडी! देश नव्हे, फक्त शहर बदलण्याचा ठेवला प्रस्ताव; हेही मान्य न केल्यास...

Bigg Boss विजेता शिव ठाकरे अडकला विवाहबंधनात, गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर लग्नातले फोटो व्हायरल

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SCROLL FOR NEXT