Eknath Shinde News sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच कमाला सुरूवात केली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच कामाला सुरूवात केली आहे. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील रखडलेल्या विविध प्रकल्पाला नवसंजीवनी देणार असल्याचं सांगितलं आहे. "आम्ही राज्यातील विकास प्रकल्पाला त्याचबरोबर जलसंपदाच्या कामाला चालना देणार आहोत. जलसंपदाच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमीन पाण्याखाली येणार आहेत. राज्याचा विकास करण्यासाठी जे करता येईल ते सर्व राज्य सरकार करणार आहे." असं मुख्यमंत्री म्हणाले. (CM Eknath Shinde News)

"आज वसंतराव नाईक यांची जयंती आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्रात कृषी दिन साजरा करतात. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या नाही झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न असेल. गोव्यातील आमदार उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. ते आल्यावर आम्ही बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहोत." असं त्यांनी सांगितलं.

"शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकरी संकटात येऊन नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचं जीवन सुखी झालं पाहिजे यासाठी राज्य सरकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने संकल्प करत आहे. तसेच राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जातील. राज्याच्या विकासासाठी जे जे करता येईल ते आम्ही करणार आहोत" असं त्यांनी सांगितलं आहे.

मुंबईत जास्त पाऊस आहे, तेथील लोकांना काही त्रास न व्हावा यासाठी आम्ही आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेत आहोत असंही त्यांनी सांगितलं. मेट्रो आणि शेतकऱ्यांसाठी फायद्याचे प्रकल्प आम्ही राबवणार आहोत. सध्या गोव्यात असलेले आमदार उद्या मुंबईत येणार आहेत आणि राज्यपालांनी ३ आणि ४ तारखेला विशेष अधिवेशन बोलावलं आहे तेव्हा आम्ही बहुमत चाचणीला समोर जाणार आहोत असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT