CM Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde : खड्ड्यांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री 'ऑनफिल्ड'; अधिकऱ्यांना दिले खड्डे बुजवण्याचे आदेश

उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

दत्ता लवांडे

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने मोठी वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. त्यानंतर आज (रविवारी) मुख्यमंत्र्यांनी स्वतः उतरून या महामार्गाची पाहणी केली. तसेच उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

दरम्यान, ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी पाहणी करून हे खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अनिल राठोड आणि एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते.

मागच्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई या भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या बातम्या समोर आल्या होत्या. ठाण्यातील मुख्यमंत्री असूनसुद्धा ठाण्यातील रस्त्यावर खड्डे असल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT