Eknath Shinde Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

CM एकनाथ शिंदेंचं ठाकरेंच्या शिवसेनेला पत्र; म्हणाले, "आपल्यासोबत..."

शिवसेनेतल्या बंडानंतर हे दोघे आमनेसामने येण्याची जोरदार चर्चा होती.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं आणि एकनाथ शिंदे शिवसेनेतले बहुसंख्य आमदार घेऊन पक्षातून वेगळे झाले. त्यानंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदेंचे जणू दोन गटच पडले. या दोघांमधली वादाची ठिणगी थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. अशातच ठाकरे शिंदे आमनेसामने येण्याच्या चर्चा रंगू लागल्यात.

याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला एक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी चहापानासाठी शिवसेनेला आमंत्रित केलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना हे पत्र लिहिलेलं आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाचं आमंत्रण या पत्राद्वारे देण्यात आलं आहे. या निमित्ताने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याबरोबर अनौपचारिक, मनमोकळी, सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा व्हावी, या हेतूने निमंत्रित करत असल्याचं पत्रात लिहिलेलं आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्या म्हणजे १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तयारीला सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी हा चहापानाचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर लगेचच राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा'; उर्वरित ४७ टक्के शेतकऱ्यांच काय?

पहिल्या पतीसोबत घटस्फोट तर दुसऱ्याने केली मारहाण; आता शेती करतेय अभिनेत्री, सांभाळतेय ३२ गाई, २२ वर्ष सगळ्यांपासून आहे दूर

मोंथा इफेक्ट! विदर्भात ऑरेंज तर उर्वरित राज्यात यलो अलर्ट; दोन दिवस मुसळधार

Latest Marathi News Live Update : 'शासनाने काढलेला जीआर रद्द करावा', नांदेडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मोर्चा

Nagpur Farmers Protest : बच्चू कडूंच्या नेतृत्वात हजारो शेतकरी नागपूरच्या वेशीवर धडकले, महामार्ग ठप्प; आज 'रेल्वे रोको'चा इशारा

SCROLL FOR NEXT