महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde | शिवतीर्थावर भेटीचा सिलसिला; CM शिंदे घेणार राज ठाकरेंची भेट?

गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भाजप नेत्यांच्या भेटीचा सिलसिला पाहायला मिळत आहे.

धनश्री ओतारी

गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भाजप नेत्यांच्या भेटीचा सिलसिला पाहायला मिळत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.(CM Eknath Shinde will meet mns Raj Thackeray today Maharashtra politics)

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांची आज सायंकाळी ४ वाजता भेट घेणार असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी भाजप मनसेसोबत युती करणार असल्याची चर्चाही सुरू आहे. विशेष म्हणजे पुढच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधीच एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंची भेट घेणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठं अपडेट! अहवाल कधी येणार? पगारवाढ कधी? संसदेत सरकारने दिली माहिती

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेनंतर हिंदूत्ववादी संघटनांकडून मंचाचे शुद्धीकरण; काँग्रेसचा भाजपवर निशाणा- हा तर दलितांचा अपमान

Ghatkopar Landslide Case: मुंबईतील मुक्काम ठरला अखेरचा! घाटकोपरमध्ये दरड कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

Ghatkopar Landslide: भाच्यांना वाचवले, पण मुलाला गमावले; घाटकोपर दुर्घटनेत १६ वर्षीय मोहम्मदचा मृत्यू

Child Cancer: मुलांभोवती कर्करोगाचा विळखा घट्ट! चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना मोठा धोका; अन्य ‘सार्क’ देशांतील आजार वाढला

SCROLL FOR NEXT