CM Eknath Shinde Ashadhi Palkhi Sohala esakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Palkhi Sohala : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींनंतर CM शिंदे प्रथमच आषाढी यात्रेत वाखरी ते पंढरपूर चालणार

मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री आषाढी पालखी सोहळ्यात चालणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली.

सकाळ डिजिटल टीम

यंदाच्या आषाढी पालखी सोहळ्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाखरी ते पंढरपूर असा पायी वारी देखील करणार आहेत.

पंढरपूर : शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच आषाढी पालखी सोहळ्यामध्ये (Ashadhi Palkhi Sohala) वाखरी ते पंढरपूर पाच किलोमीटर अंतर चालणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून आषाढी यात्रा कालावधीमध्ये वारकऱ्यांना चार दिवस मोफत अन्नदान करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी पंढरपुरात दिली.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आज दर्शन बारी, वाखरी पालखीतळ, ६५ एकर परिसराची पाहणी करून माहिती घेतली. पाहणीनंतर मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री आषाढी पालखी सोहळ्यात चालणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली. पंढरपूरला आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घातले आहे.

त्यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर व पालखी परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. लवकरच मुख्यमंत्री आषाढी यात्रेच्यापूर्वी पंढरपूरचा पाहणी दौरा करणार आहेत. याशिवाय यंदाच्या आषाढी पालखी सोहळ्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाखरी ते पंढरपूर असा पायी वारी देखील करणार आहेत. आषाढी यात्रेपूर्वी ठाणे जिल्ह्यातील एक विशेष पथक आषाढी यात्रेमध्ये काम करणार आहे. लवकरच हे पथक पंढरपूरमध्ये येणार असून आषाढी यात्रेनंतर देखील हे पथक काम करणार आहे, असेही चिवटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT