Nana Patole Devendra Fadnavis Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole: राज्याचे मुख्यमंत्री रुसून बसतात, उपमुख्यमंत्री परदेशात जातात, पण...; पटोलेंचा गंभीर इशारा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकावर गंभीर आरोप केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यंमत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री रुसून बसतात, उपमुख्यंमत्री परदेशात निघून जातात, हे काय चाललंय असा सवालही त्यांनी केला आहे. (CM got displeased DCM go abroad serious warning from Congress Nana Patole)

पटोले म्हणाले, अवकाळी पाऊस आणि गारपीट जी सुरु आहे यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचा चिखल झालेला आहे. यामध्ये भाजीपाला असेल गहू, हरभरा, फळं या सर्वांचं मोठ्या प्रमाणावर अमाप नुकसान झालं आहे. पण सरकारला याचे पंचनामे करायला वेळ नाही. राज्याचे मुख्यमंत्री रुसून बसतात आणि उपमुख्यमंत्री परदेशात जातात. सरकार जागेवर नाही. जनतेची लूट करुन आपला प्रचार करण्याचं काम सरकार करत आहे.

सरकारजवळ पंचनामे करायला वेळ नाही, त्यामुळं पंचनामे न करता तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकावेत, त्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात. सरकारनं यामध्ये तातडीनं लक्ष घातलं नाही तर याचं जनआंदोलन आम्ही करु, याचे सगळे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशाराही यावेळी पटोले यांनी दिला.

एकीकडं खतांचे भाव वाढवले दुसरीकडं डिझेलचे भाव वाढवले. पर्यायानं शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव देणं, त्यांना रोज लुटण, प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या नावाखाली जे २००० रुपये दिले जातात. म्हणजे शंभर रुपये घ्यायचे आणि दहा पैसे द्यायचे हा जो व्यावसायिक दृष्टीकोन पंतप्रधान मोदींनी आणलं आहे. शेतकऱ्यांवर कर्ज असेल तर या योजनेचे २००० रुपये बँका कापून टाकतात. त्यामुळं ही फसवी योजना असून यामार्फत शेतकऱ्यांना फसवलं जात आहे.

त्यामुळं खताचे दर, डिझेल, शेतीचे अवजारं यांचे भाव, कर कमी केले पाहिजेत. तुम्ही अदानीचा जीएसटी कमी करता तर शेतकऱ्यांचा कर का कमी करत नाही, मोदी सरकारनं ही व्यापारी वृत्ती थांबवावी, असा इशारा काँग्रेस देत आहे. महाराष्ट्र दिन साजरा करताना इथलं शेतकरी, तरुण, गरीब सुखी नसेल तर या सगळ्यांचा धिक्कार करायची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT