Eknath Shinde Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून CM शिंदेंनी बोलवली सर्वपक्षीय बैठक; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार?

रोहित कणसे

Maratha Reservation : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरपावली गावात आंदोलन करत असलेले मनोज जरांगे यांचा मनधरणी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार सातत्याने करत आहे. शिष्टमंडळाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर देखील जरांगे आंदोलनावर ठाम आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून उद्या मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली असून सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॅाग्रेस सोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट , काँग्रेस, मनसे यांच्यासह शिवसेनेच्या ठाकरे गटालाही बैठकीच निमंत्रण दिले जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निमंत्रण स्विकारून बैठकीला येणार का…? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षण मुद्द्यावर राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील चर्चेची तिसरी फेरी देखील अपयशी ठरली आहेत. ७ सप्टेंबरला सरकारने आरक्षणासंदर्भात सरकारने जीआर काढला. मात्र त्यातील वंशवाळीचा मुद्दा हटवावा आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. यासंदर्भात काल (शुक्रवार) मुंबईत झालेल्या बैठकीत नवीन जीआर काढण्यात आला मात्र या जीआर मध्ये दुरुस्ती झाली नसल्याने उपोषण सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT