eknath shinde on maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदे चिडले, ''मराठ्यांनी अनेकांना मोठं केलं, पण जेव्हा त्यांना द्यायची वेळ आली तर हे तेढ निर्माण...'', मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरुन होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांवर थेटपणे भाष्य केलं आहे. ज्या मराठा समाजाने अनेकांना मोठं केलं त्या मराठा समाजाला आज जेव्हा देण्याची वेळ आलेली आहे, तेव्हा समाजात तेढ निर्माण करणं चुकीचं आहे.. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आहे.

संतोष कानडे

मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरुन होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांवर थेटपणे भाष्य केलं आहे. ज्या मराठा समाजाने अनेकांना मोठं केलं त्या मराठा समाजाला आज जेव्हा देण्याची वेळ आलेली आहे, तेव्हा समाजात तेढ निर्माण करणं चुकीचं आहे.. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आहे.

प्रतापगडावरील गडकोट मोहिमेच्या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. मागच्या ३९ वर्षांपासून रायरेश्वर ते प्रतापगड अशी पायी दौड तरुण करत असतात, तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.. असं यावेळी शिंदे म्हणाले.

मराठा आरक्षणावरुन होणाऱ्या टीका टिपण्णीवरुन माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं आणि ओबीसींसह इतर समाज घटकांवर अन्याय न होऊ देणारं आरक्षण सरकार देणार आहे.

राज्यात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडू लागलेल्या आहेत, त्यासंदर्भात नोटिफिकेशनदेखील काढण्यात आलंय. आरक्षणाची स्पष्टता येण्यासाठी कालचं नोटिफिकेशन काढण्यात आलेलं असून समाजाला न्याय मिळावा, अशी सरकारची भूमिका आहे.

शिंदे पुढे म्हणाले, मराठा समाजाला न्याय मिळावा, अशी सगळ्यांचीच भूमिका असूनही काही लोक वेगळी विधानं करत आहेत. मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली.. अशी विधानं करणं चुकीचं आहे. मराठा समाजाने अनेकांना मोठं केलं. परंतु जेव्हा मराठ्यांना देण्याची वेळ आली तेव्हा असं बोलू नये. हे सरकार सगळ्यांचं आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम कुणीही करु नये.

राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरकारच्या कुणबी नोंदीसंदर्भातील अधिसूचनेवरुन नाराजी व्यक्त केली होती. नारायण राणे सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत. तर भुजबळांच्या निवासस्थानी सायंकाळी ५ वाजता ओबीसी नेत्यांची बैठक सुरु झालेली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा रोख नेमका कुणाकडे होता, असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan Video: धर्मेंद्र प्रधानांचं जंगी स्वागत; राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच संसदेत आले; BJP च्या खासदारांनी पाहा काय केले...

Vaibhav Sooryavanshi: रोहितसोबत वैभव सूर्यवंशीनेच सलामीला यावं! माजी दिग्गजाचा मोठा सल्ला, गिलबाबतही केलं मोठं वक्तव्य

देवदूत! पुरात अडकलेल्या चिमुरड्यासाठी ५ जणांनी लावली जीवाची बाजी; काळजाची धडधड वाढवणारा, Video Viral

Goa Casino Industry : गोव्यातील वादग्रस्त कॅसिनो आता महाराष्ट्राच्या सीमेवर? नव्या ठिकाणांचा सिंधुदुर्गात शोध, निवडणुकीआधी भाजप सरकारवर मोठा दबाव!

Latest Marathi News Live Update: सरकारी पक्षाने अंकित शर्मा यांची हत्या केल्याप्रकरणी ताहिर हुसेन आणि इतर चौघांसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली

SCROLL FOR NEXT