cm eknath shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : CM शिंदेंच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाबाबत आज महत्वाची बैठक; काय होणार निर्णय?

रोहित कणसे

राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि ते सोलापूर, औरंगाबाद, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पसरले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज एक महत्वाची बैठक पार पडणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह होणाऱ्या या बेठकीला मराठा आरक्षण मंत्री उपसमितीमधील सर्व सदस्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित रहाणार.

तसेच या बैठकीत मराठवाडा विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, परभणी, अहमद नगर, जालना, नांदेड, लातूर, या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक असे सर्व वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी देखील सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र सरकारने जरांगे पाटील यांना बोलावलं

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना देखील महाराष्ट्र सरकारने निमंत्रण दिले आहे. सरकारी सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारी अधिकारी आणि जरंगे पाटील यांच्यात बैठक होणार असल्याचे सूत्राने सांगितले.

जरंगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ते उपोषणाला बसले होते. अधिकाऱ्यांनी त्याना रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केल्यानंतर शुक्रवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळ पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याचा प्रकार घडल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.

राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून रास्तोरोको आंदोलन करण्यात आले. इतकेच नाही तर वाहनांची तोडफोड देखील करण्यात आल्याचे प्रकार समोर आले. पोलिसांकडून अनेक आंदोलन कर्त्यांवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT