Eknath shinde Amit Shah Sakal
महाराष्ट्र बातम्या

Amit Shah: राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु असतानाच CM शिंदे अमित शहांना भेटणार

अमित शहा एकाच महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर; चर्चांना उधाण

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच भाजपच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झालं आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातील दौरे वाढल्याचे दिसून येत आहे. आजपासून अमित शहा दोन दिवस नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. (Latest Marathi political news)

दोन आठवड्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर आता अमित शहांचा एप्रिल महिन्यांतील हा दुसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

एकाच महिन्यात अमित शहा दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी जामठा इथल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस (Police) आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

आज रात्री अमित शाह नागपूरात (Nagpur) दाखल होणार आहेत. अमित शाह यांच्या पक्षीय बैठकाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेसुद्धा रात्री नागपूरमध्ये अमित शहा यांच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती आहे. अमित शहांच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे नागपूर विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. (Maharashtra political News)

अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अमित शाहांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून या दौऱ्यानंतर येत्या काळात काही नवीन राजकीय घडामोडी घडणार का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

अशातच राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात अनेक घडामोडी घडत असतानाच अमित शाह यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड अटकेत... २५ वर्षांपासून देशभरात चालवत होता रॅकेट, कोण आहे बिजेंद्र गुप्ता?

IND vs ZIM 2nd T20I: वैभव सुर्यवंशीची स्फोटक फलंदाजी आजही पाहायला मिळणार; भारत- झिम्बाब्वे दुसरा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Live Updates Marathi : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; धरणांतील पाणीसाठ्याने मागील वर्षाची सरासरी ओलांडली

नवी पिढी प्रश्न विचारणारी, लॉजिक जाणून घेणारी; आदेशाऐवजी...; सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले?

Heavy Rain Effects: गुजरातमध्ये पावसाचा धुमाकूळ कायम, आसाममध्ये गंभीर स्थिती, काश्‍मीरमध्येही हजेरी

SCROLL FOR NEXT