jitendra awhad.jpg 
महाराष्ट्र बातम्या

आव्हाडांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा टाटा कॅन्सर रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या १०० सदनिका देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे पक्षाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्तेच टाटा कॅन्सर रुग्णालयाला या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावर ‘तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी’ असा शेरा मारत या निर्णयाला मुख्यमंत्री ठाकरेंकडून ब्रेक लावण्यात आला आहे.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत प्रतिष्ठेचा केलेला हा प्रकल्प स्थानिकांना अजिबात भावला नसल्याची तक्रार खासदार अरविंद सावंत आणि आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या दोघांनीही काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आणि आक्षेपाचे मुद्दे समजावून सांगितले. हा प्रकल्प रद्द होईल काय? अशी चर्चा आज सकाळपासून शिवसेना वर्तुळात सुरू असताना रात्री उशिरा या निर्णयाला स्थगिती देण्यात आली .

‘म्हाडा’ने भोईवाड्यात बांधलेल्या इमारतीतील सदनिका रिकाम्या असताना आपल्याच मालकीच्या इमारतीतील जागा कॅन्सर रुग्णांसाठी वापरावी असे पत्र देण्यात आले होते. मराठी माणसांना रस्त्यावर आणून हा प्रकल्प का राबविता? अशी व्यथा खासदार, आमदारांनी पत्रात व्यक्त केली होती. आव्हाड यांना सातवेळा स्मरणपत्रे पाठवून त्यांनी साधी दखलही घेतली नसल्याची तक्रार खासदार, आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

माझा कोणताही स्वार्थ नव्हता ः आव्हाड

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीबाबत जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की,‘‘ आपण हा निर्णय एका उदात्त भावनेने घेतला होता. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाइकांची राहण्याची सोय व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला स्थगिती मिळणे ही दुर्दैवाची बाब आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवलेली नव्हती. ते आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. मी कुठलाही निर्णय घेताना त्यांना पूर्वकल्पना देतो. म्हाडाच्या सदनिकांच्या चाव्या टाटा रुग्णालयाला सुपूर्द करतानाही आपण मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. मात्र, याबाबत काही गैरसमज झाले असावेत. आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT