CM Maharashtra 
महाराष्ट्र बातम्या

..अन् CM ठाकरेंनी PM मोदींचे मानले आभार

नामदेव कुंभार

देशात सध्या कोरोना महामारीचा (Covid-19) हाहा:कार सुरु आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा मंगळवारी रद्द करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांचं आभार मानत धन्यवाद दिले आहेत. परीक्षा रद्द केल्यानंतर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अजून सुरूच असल्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठीच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई परीक्षा रद्द केल्यामुळे मोदी यांचे आभार मानले आहेत.

करोना महामारीचा संसर्ग अजूनही वाढत आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीसारख्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पालकांकडूनही होत होती. दोन दिवसांपूर्वी जनतेला संबोधित करताना बारावी आणि दहावी तसेच इतर महत्वाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर केंद्र सरकारकडून सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

कोरोनाच्या संसर्गामुळे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा यापूर्वीच रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र शिक्षण मंत्रालयातील काहींच्या आग्रहामुळे बारावी परीक्षा घेण्याबाबत घोळ सुरू होता. महाराष्ट्र आणि दिल्लीसह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी यंदा परीक्षा रद्द कराव्यात असे आग्रही प्रतिपादन केले होते. या काळात परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करणे आहे, अशी भावना राज्य सरकारांनी केंद्राकडे कळवली होती. याशिवाय देशातील तीन हजार विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा रद्द करावी, असे पत्र सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पाठवले होते. बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत येत्या गुरुवारपर्यंत अंतिम निर्णय कळवू, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करणे किंवा दीड तासाची छोटीशी पण मुख्य विषयांची परीक्षा घेणे हे दोन ठळक पर्याय केंद्र सरकार समोर होते. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन यातील पहिल्या पर्यायावर शिक्कामोर्तब केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

Hingoli Earthquake :हिंगोली जिल्हा भूकंपाने पुन्हा हादरला ;गडाळा, पांगरा शिंदे येथे केंद्रबिंदू; भिंतींनाही तडे

Latest Marathi News Live Update : अकोला दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री बावनकुळेंचा संवाद; पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश, २० वर्षे जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची फाइल पुन्हा उघडली

SCROLL FOR NEXT