CM_Uddhav_Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Breaking: संजय राठोड प्रकरणावर मुख्यमंत्री पहिल्यांदा बोलले; 'गलिच्छ राजकारण'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांनी आज माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणाचा नि:पक्षपणे तपास व्हावा, अशी माझीही भूमिका आहे. याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यूनंतर जवळपास 20 दिवसांनंतर मंत्री राठोड यांनी आज राजीनामा दिला. याप्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गप्प का? असा प्रश्न विरोधकांकडून केला जात होता. या प्रकरणावरून विरोधक गलिच्छ राजकारण करत आहेत, असं मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. 

काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे?
- चौकशीत जे सत्यपुढे येईल ते स्वीकारलं जाईल.
- पूजा चव्हाण यांच्या कुटुंबियांचे पत्र, त्यांचा सरकारवर विश्वास
- दोषींवर कारवाई होणारच, तपास यंत्रणेवर विश्वास ठेवा.
- आपली सत्ता नाही म्हणून, विरोधकांनी महाराष्ट्राची बदनामी करू नका. 
- विरोधी पक्षनेत्यांच्या टीकेला अर्थ नाही, त्यांच्या टीकेची किव करावीशी वाटते.

वनखात्याचा कारभार माझ्याकडे
विधीमंडळ अधिवेशनात आता, वनखात्याची जबाबादारी कोणाकडे असेल? या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, 'खात्याची जबाबदारी मी नेमून दिलेल्या व्यक्तीकडे असते. त्यामुळं अधिवेशनात वनखात्याशी संबंधित एखादा प्रश्न उपस्थित झाला, तर त्याला मी उत्तर देईन किंवा खात्याचे राज्यमंत्री उत्तर देतील.'

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT