Maharashtra Fort
Maharashtra Fort  File Photo
महाराष्ट्र

गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सुकाणू समितीची स्थापना

सुशांत जाधव

राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुकाणू समितीची स्थापना केलीये. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या समितीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 6 किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येईल, अशी माहिती CMO महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून शेअर करण्यात आलीये. गड किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम, परिसरात पर्यटन सुविधेला चालना देताना ऐतिहासिक वास्तूला कोणताही धक्का बसणार नाही, यासारख्या सर्व बाबींवर सुकाणू समिती काम करेल. दर तीन महिन्यातून एकदा किंवा मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार सुकाणू समितीची बैठक बोलवून अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येईल (cm uddhav thackeray appointed sukanu committee preserve and protect fort in maharashtra)

सुकाणू समितीची कार्यकक्षा

  • राज्यातील गड किल्ल्यांच्या सर्वांगिण विकासासाठी अग्रक्रम ठरवणे

  • निवड करण्यात आलेल्या गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाचे कामकाज सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येईल. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विविध सुविधा निर्माण करणे, परिसरात पर्यटन केंद्र उभारणे यासंदर्भातील सर्व अधिकार हे पर्यटन उपविभागाकडे असतील.

  • जैवविविधता जतन, गडकिल्ले परिसरातील हरितीकरण याची जबाबदारी वन विभागाकडे असेल. पर्यटनाच्या दृष्टीने रस्ते तयार करण्याचे कामकाजाची जबाबदारी ही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येईल. या सर्व कामकाजांचा आढावा सुकाणू समितीकडून वेळोवेळी घेण्यात येईल.

  • गड किल्ल्याच्या आजूबाजूला असलेल्या 50 किमी परिसरात पर्यटन स्थळे, साहसी खेळ, गिर्यारोहण, किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ यासंदर्भातील सर्व माहिती गोळा करुणे, गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात गडाची प्रतिकृती यासारख्या बाबींवर काम करण्यात येणार आहे.

  • गडकिल्ल्यांच्या परिसरात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बिया टोकून या भागात नैसर्गिकरित्या वनराईची निर्मिती करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT