महाराष्ट्र बातम्या

उद्याच होणार मंत्रिमंडळ विस्तार?; कोणाला मिळणार संधी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे पहिले सहा दिवसांचे हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले असून, आता सारे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 24 तारखेला होणार असल्याचे समजते. त्यानंतर पुढील वर्षांत ठाकरे सरकारचा गतिमान कारभार सुरू होणार असल्याचे चित्र आहे. 

मुख्यमंत्र्यांबरोबरच तिन्ही पक्षांमधील अनुभवी आणि ज्येष्ठ अशा सहा मंत्र्यांचा शपथविधी शिवाजी पार्कवर झाला. त्यानंतर लगेच नागपूरला हिवाळी अधिवेशनास जाण्याची लगबग सुरू झाली. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला.

अधिवेशनानंतर 24 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच सरकार पूर्ण क्षमतेने काम करण्यास सुरुवात करेल. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सरकारच्या कामाला वेग येईल, अशी शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताई पालखीचे दर्शन घेत स्वागत केले

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT