Uddhav Thackeray  Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

'आम्ही नाही ती अंडी उबविली'; मुख्यमंत्र्यांची 'भाजप'ला टोलेबाजी

राजकारणात पटत नाही म्हणून चांगल्या कामात अडथळे आणणे ही आपली संस्कृती नाही

सकाळ डिजिटल टीम

राजकारणात पटत नाही म्हणून चांगल्या कामात अडथळे आणणे ही आपली संस्कृती नाही

बारामती - चांगल्या कामात अडथळे आणले जातायंत हे चुकीचे आहे. आम्ही नाही ती अंडी उबविली असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. सर्व पवार कुटुंबीय हे विकासाच्या ध्यासात रमलंय. फक्त विकासाचे काम करतात. राजकारणात टीकाकार असतात आणि असलेच पाहिजे. आम्हीसुद्धा तुमचे एकेकाळी टीकाकार होतो. राजकारणात पटत नाही म्हणून चांगल्या कामात अडथळे आणणे ही आपली संस्कृती नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आज ते बारामती येथे बोलत होते.

यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांचे कौतुक केले. पवार कुटुंब विकासात रंगल आहे. राजकारणात विघ्नसंतोषी खूप आहेत, ते असतातच, परंतु याकडे दुर्लक्ष करुन आपल्या कामात गुंतुन ते तडीस नेणे आवश्यक आहे. ते काम पवार कुटुंबिय करत आहेत. राजकारणात पटत नाही म्हणून चांगल्या कामात अडथळे आणणे ही आपली संस्कृती नाही. राज्याचे नाव देशात व्हावे यासाठी मी सर्वोतपरी प्रयत्न करेन, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT