Uddhav Thackeray-Devendra Fadnavis google
महाराष्ट्र बातम्या

'फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण...', मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

वैदही काणेकर

मुंबई : मंत्री नवाब मलिकांनी (Minister Nawab Malik) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) ड्रग्सप्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मलिकांनी लवंगी फटाके फोडले, आम्ही दिवाळीनंतर बॉम्ब फोडू, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिले होते. त्यानंतर आता याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे ऑफ द रेकॉर्ड बोलले आहेत.

''गेल्या दीड वर्षात कोरोना होता. आता जरा शांतता आहे. पण, पाश्चिमात्य देशात तिसरी लाट आली आहे. लस न घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याच बाहेरच्या व्हेरीयंटची आपल्याला देखील भीती आहे. पहिली लाट आली तेव्हा सगळे मिळून ऑक्सिजन, बेड सर्व होते. मात्र, त्यानंतर ते सर्व कमी पडायला लागलं. कोरोनावर अजून औषध नाही. ऑक्सिजनचे सव्वा लाख बेड उपलब्ध आहेत. पण, कोरोनाचा पीक होता त्यावेळी बाहेरून ऑक्सिजन मागवावे लागले होते. आता आपले स्वतःचे ऑक्सिजनचे प्लांट आहेत. कोरोनावर अजून रामबाण औषध नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे, असंही ते म्हणाले'', असं उद्धव ठाकरे म्हणाले.

फडणवीसांना टोला -

देवेंद्र फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचं वक्तव्य केलं. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, ''काहीजण बॉम्ब फोडणार आहे, असं समजतं. फोडा काय बॉम्ब फोडायचे आहेत. पण, पाकिस्तानात कधी बॉम्ब फोडणार ते सांगा आधी? मी त्याची वाट बघतोय. दिवाळीला राजकीय फटाक्यांची गरज नाही.''

फडणवीस नेमके काय म्हणाले होते? -

मंत्री नवाब मलिक यांनी ''देवेंद्र फडणवीसांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध आहेत'' असा गंभीर आरोप केला होता. तसेच त्यांची पत्नी अमृता फडणवीसांचा एक फोटो ट्विट करून त्यामध्ये असलेली व्यक्ती जयदीप राणा हा ड्रग्स पेडलर असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. त्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत मलिकांना उत्तर दिले होते. तुम्ही लवंगी फटाका फोडला, पण दिवाळीपर्यंत थांबा मी बॉम्ब फोडणार आहे, असं फडणवीस म्हणाले होते. त्यालाच आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT