uddhav thackeray  uddhav thackeray
महाराष्ट्र बातम्या

जनतेची कामं थेट माझ्याकडे घेऊन या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्य कारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये, असे म्हटले आहे.

जिल्हाधिकारी आणि महसूल यंत्रणेची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली, या बैठकीय त्यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या या राजकीय अस्थिरतेच्या काळात लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या बैठकीत विविध कामांचा विस्तृत आढावा घेतला.

तसेच कोरोना, पेरण्या, खतांची उपलब्धता त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तयारी, आषाढी वारीतील वारकर्‍यांच्या सुविधा याविषयी महत्त्वाच्या सूचनाही केल्या. जनतेशी संबंधित महत्वाची कामे थांबवून ठेवू नका , ती थेट तातडीने माझ्याकडे घेऊन या असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

यादरम्यान राज्यातील सत्तेचा पेच अद्याप सुटलेला नाही. यापुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत बंडखोर आमदारांना आव्हान दिलं, ते म्हणाले होते की, माझं नाव, माझा फोटो आणि शिवसेना हे नाव न वापरत जगून दाखवा, तुमच्याकडून शिवसेना फोडण्याचं पाप झालंय. तुकडे तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. मी बाळासाहेबांचे फोटो वापरून ब्लॅकमेल करत नाही.

एकनाथ शिंदेंसाठी काय नाही केलं? माझ्याकडची 2 खाती मी शिंदेंना दिली. शिंदे बडव्यांबद्दल बोलतात, ज्यांचा मुलगा शिवसेनाकडून खासदार आहे. शिंदेंसाठी मी काय कमी केलं?, असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजपसोबत जायला पाहिजे म्हणून काहींचा दबाव आहे पण मी शांत आहे षंढ नाही. आदित्यला बडवे म्हणायचे आणि स्व:ताचा पोरगा खासदार, त्यांना काय कमी केलं? नगरविकास खातं त्यांच्याकडं दिलं, अजून काय हवं होतं? हे सारं भाजपने केलंय, त्यांची आग्र्याहून सुटका करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT